हर्डीकर यांच्या युरोप दौऱ्याच्या चौकशीची मागणी

पिंपरी – महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर हे मागील महिन्यात वीस दिवसांसाठी युरोप दौऱ्यावर गेले होते. त्यांचा हा दौरा खासगी स्वरुपाचा व व्यक्तीगत खर्चातून झाल्याचा दावा केला जात असला तरी हा दौरा संशयास्पद असून या युरोप दौऱ्याची सीबीआय व इन्फोर्समेंट डायरेक्‍टोरेट (ई. डी.) यांच्यामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय भुसारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राव्दारे केली आहे.

आयुक्तांसमवेत काही लोक या दौऱ्यात सहभागी झाले होते. त्यांचीही चौकशी करावी. त्यामुळे या दौऱ्याचे कारण व गुलदस्त्यात असलेल्या अनेक गोष्टी शहराला समजू शकतील. आपण पारदर्शक प्रशासनाचा नारा दिला. त्यामुळे या देशातील जनतेने एकमुखी आपल्याला पाठींबा दिला आहे. जर प्रशासनातील लोकांच्याबाबत शंका येत असेल तर त्याची पारदर्शकपणे निष्पक्ष चौकशी होण्याची आवश्‍यकता असल्याचे बुरसे यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)