हरिसन ब्रॅंच शेतकऱ्यांचे भरणे तातडीने पूर्ण करा 

आ. स्नेहलता कोल्हे यांचे अधिकाऱ्यांना आदेश : जेउरकुंभारी येथे शेतकऱ्यांसह बैठक
कोपरगाव – गोदावरी उजव्या कालव्याचे लाभधारक क्षेत्र मोठे आहे. चालू वर्षी धरणात पुरेसे पाणी असूनही त्याचे पाटबंधारे खात्याकडून व्यवस्थित नियोजन होत नाही. त्यामुळे हरिसन ब्रॅंच चारी लाभधारक शेतकरी प्रत्येक आवर्तनात दुर्लक्षित राहतात. तेव्हा त्यांचे पाटपाण्याचे भरणे तातडीने पूर्ण करून द्यावे, असे आदेश आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिले.
गोदावरी उजव्या कालव्यावरील लाभधारक शेतकऱ्यांच्या पाटपाण्याच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी हरिसन ब्रॅंच चारी, जेउरकुंभारी येथे आमदार कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात त्या बोलत होत्या. प्रारंभी गोदावरी उजवा तट कालव्याचे उपअभियंता कासम गोतुमवार यांनी पाटपाण्याच्या भरण्याबाबत तपशील सांगितला. “संजीवनी’चे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब वक्‍ते, मधुकर वक्‍ते, राजेंद्र गहिनाजी गुरसळ, जालिंदर चव्हाण, सुभाष सांबारे (रामपूरवाडी), विजय कारभारी शिंदे, धर्मा होन यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
आ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, प्रत्येक आवर्तनात उजव्या कालव्याच्या पाटपाण्याचे आवर्तन कोलमडते. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी असूनही ते पिकांना मिळत नाही. त्याबाबत असंख्य तक्रारी आपल्याकडे दाखल झाल्या आहेत. बारमाही ब्लॉकधारक शेतकऱ्यांना तसेच सात नंबरवर अर्ज भरूनही पाणी दिले जात नाही हे बरोबर नाही. शेतकरी पाण्यासाठी मेटाकुटीला आला आहे. त्याच्या सहनशीलतेचा पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी अंत पाहू नये, अन्यथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे याबाबत अहवाल पाठवू.
कालवा सल्लागार समितीत ठरलेल्या नियोजनाप्रमाणे गोदावरी कालव्यांना पाणी दिले पाहिजे. त्याचा दाबही पुरेशा प्रमाणात असला पाहिजे. केवळ कुणाच्या दबावाखाली व सांगण्यावरून प्रसिद्धीचा स्टंट करण्यासाठी जलसंपदा खात्याचे गोदावरी उजव्या कालव्यावरील अधिकारी वागत असतील तर त्यांची आपण गय करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मधुकर वक्‍ते यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)