हरिश्‍चंद्र गडावर 20 पर्यटक अडकले

अकोले – हरीशचंद्र गडावर पंधरा ते वीस पर्यटक अडकले. ठाणे जिल्ह्यातील ट्रेकर्स रस्ता उतरताना रास्ता चुकल्याने अडकले आहेत. अडकलेल्या पर्यटकांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यलालयात संपर्क साधल्याने प्रशासनाच्या हालचाली सुरु. रात्र असल्याने येतायेता मदत कार्यात अडथळे सकाळी ठाण्याच्या प्रशिक्षीत गिर्यारोहकांन कडुन केला जाणार शोध सुरु असल्याची माहिती तहशीलदार मुकेश कांबळे यांनी दिली.

ठाणे जिल्यातील बाजूने येणाऱ्या पर्यटकांच्या रॅपलिंगच्या दोराचा आग्यामोहळाच्या पोळाला धक्का लागल्याने हा अनर्थ ओढवला आहे.

कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी हे 20 जणांसोबत हरिश्‍चंद्रगड येथे ट्रेकिंग साठी गेले असता तेथून पुढे दीड किलोमीटर कोकणकडा येथे 1000 फूट खाली हे सर्व ट्रेकर अडकले आहेत. या ट्रेकर्सना एनडीआरएफच्या मदतीने वाचविण्याचे प्रयत्न सुरू असून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण तहसीलदार आणि पोलीस यांना देखील यासंदर्भात समन्वय ठेऊन ट्रेकर्सची सुटका कशी होईल ते पाहण्यास सांगितले आहे.

डॉ. अडवाणी यांचेशी संपर्क झाला असून त्यांच्यासोबत 5 महिला व 17 पुरुष आहेत. कोकणकडा पासून खाली 800 फूट ते आहेत. अंधार असल्याने त्यांना मार्ग सापडत नाही. त्यामुळे बचाव पथकाला त्यांचे नेमके लोकेशन पाठवण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे ग्रामीण पोलीस तसेच जुन्नर पोलीस यांना देखील या घटनेविषयी कळविले असून तहसीलदार अमित सानप या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)