हरियाणा सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य 

नवी दिल्ली – हरियाणामध्ये बुधवारी निर्भया प्रकरणाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे. सीबीएसई टॉपर आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार सन्मानित १९ वर्षीय मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला. घटनेच्या दोन दिवसांनंतरही आरोपी फरार आहेत. या प्रकरणासाठी विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती करण्यात आली आहे.

या प्रकरणावर बोलताना भाजप आमदारांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजप आमदार प्रेमलता म्हणाल्या की, बेरोजगारीमुळे तरुणांना मानसिक तणाव येतो व ते बलात्कारसारखे गंभीर गुन्हे करतात, असा अजब शोध त्यांनी लावला आहे. या वक्तव्यांनंतर आता प्रेमलता यांच्यावर चहुबाहुंनी टीका होण्यास सुरूवात झाली आहे.  दरम्यान, याआधी प्रेमलता यांनी पीडित मुलीची भेट घेतली व तिची प्रकृती  स्थिर असल्याचे माध्यमांना सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)