हरियाणा भाजपात बंडाचे सूर-राष्ट्रवादी विचार मंच स्थापना 

कैथल (हरियाणा): हरियांणा भाजपात बंडाचे सूर उमटू लागले आहेत. सुमारे 25 नेत्यांनी बैठक घेऊन संघटना आणि सरकारवर अनेक आरोप करत राष्ट्रवादी विचार मंच स्थापनेची घोषणा केली आहे. त्यांची ही पाचवी बैठक असून यापूर्वी गुरुग्राम, जींद, हिस्सार आणि कर्नाल जिल्ह्यांत बैठका झाल्या आहेत.

या बैठकीत रोडवेज संपाला पाठिंबा देऊन 720 बसेसचे परमिट कोणा सत्ताधारी नेत्यांना दिली आहेत, ते उघड करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. 25 डिसेंबर रोजी एका रॅलीचे आयोजन करून निष्ठावान कार्यकर्त्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे व बाहेरून आलेल्यांकडून त्यांच्या होणाऱ्या अपमानांकडे राष्ट्रीय नेतृत्वाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हिस्सारचे माजी जिल्हाध्यक्ष कृष्णलाल रिणवा यांना मंचाचे पदाधीकारी नियुक्त करण्याचे अधिकार सर्वसंमतीने देण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या स्वभिमानी कार्यकर्त्यांच्या बैठका प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)