हरियाणा पालिका निवडणुकीत “नोटा’ला सर्वाधिक मते मिळाल्यास फेरनिवडणूक 

चंडीगड/पानिपत (हरियाणा) – हरियाणा पालिका निवडणुकीत “नोटा’ला सर्वाधिक मते मिळाल्यास फेरनिवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. डिसेंबर महिन्यात पाच जिल्ह्यात पालिका निवडणुका होत आहेत. त्यावेळी हा नियम लागू करण्यात येणार आहे.

नोटा म्हणजे यातील कोणीही नाही, असा निर्णय मतदारांनी दिला, तर फेरनिवडणूक घेण्यात येईल आणि त्या निवडणुकीतील सर्व उमेदवार अपात्र ठरवले जातील. असा निर्णय देशात प्रथमच घेण्यात आला आहे. आजवर नोटा’ ला सर्वाधिक मते मिळाल्यास दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारास विजयी घोषित करण्याचा नियम होता.

-Ads-

नोटा ला एक काल्पनिक उमेदवार मानला जाईल असे हरियाणाचे मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. दिलीप सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जर दुसऱ्या मतदानातही नोटा’ ला सर्वाधिक मते मिळाली, तर मात्र दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारास विजयी घोषित करण्यात येईल, हा नियम फक्त पालिका निवडणुकींना लागू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

नोटा’ सर्वप्रथम सन 2013 मध्ये लागू करण्यात येऊन छत्तीसगड, मिझोरम, राजस्थान, मध्य प्रदेश, आणि केंद्रशासित प्रदेश दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा वापर करण्यात आला. असलेल्या कोणाही उमेदवाराला मत देण्याची इच्छा नसल्यास मतदाराला नोटा’चा पर्याय निवडता येतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)