हरियाणाच्या व्यापाऱ्याचा मुंबईतील बारमध्ये गोळीबार

मुंबई : मुंबईतील एका बारमध्ये क्षुल्लक कारणावरून हवेत गोळीबार करणाऱ्या हरियाणामधील व्यापाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना २४ जूनची असून या व्यापाऱ्याचे नाव राकेश कालरा असे आहे. या व्यापाऱ्याला बारमध्ये बंदुकीसह प्रवेश दिल्याने पोलिसांनी वेटर आणि बारच्या मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अंधेरी येथील एका बारमध्ये या व्यापाऱ्याने मित्राच्या पार्टीत गोळीबार केला. हा व्यापारी त्याच्या तीन मित्रांसोबत या बारमध्ये आला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याचा सुरक्षारक्षक सुद्धा होता. बार मॅनेजमेंटसोबत या वापाऱ्याचा व त्याच्या मित्रांचा वाद झाल्याने या व्यापाऱ्याने हुज्जत घालीत हवेत गोळीबार केला. त्यामुळे बारमध्ये एकच गोंधळ उडाला. हवेत गोळीबार करत असल्याचा फोटो आणि व्हिडिओ सुद्धा या व्यापाऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)