हरियाणाची नेमबाज युवती मनू

   प्रेरणा

 दत्तात्रय आंबुलकर

हरियाणाने साहसी खेळात नेहमीच आघाडी राखली आहे. कधी घरी-दारी मुलींशी दुजाभाव करणाऱ्या हरियाणाने गेल्या काही वर्षांत मुलींना समाजाप्रमाणेच विविध क्रीडा प्रकारात बरोबरीचे स्थानच दिले असे नव्हे तर त्यांना गौरवपर वागणूक पण दिली असल्याचे दिसून येते. “दंगल’मध्ये हरियाणाच्या भोगट परिवाराची सत्यकथा फिल्मी स्वरूपात आपण पाहिली असून त्याचेच प्रत्यंतर नेमबाजीच्या संदर्भात हरियाणाच्याच जझ्झर जिल्ह्याच्या गोरीया या खेडेगावात आजही येत असून त्याचीच ही कथा-

गोरीया गावच्या शाळेत शिकणाऱ्या मनू भाकर या 16 वर्षीय शालेय युवतीने शाळेत असतानाच नेमबाजीत आपले विशेष स्थान निर्माण केले असून, मुख्य म्हणजे तिच्या या धाडशी यशापासून प्रेरणा घेऊन गावची अनेक लहान मुले पण नेमबाजीचा नियमित सराव करीत असून त्यांची मार्गदर्शक ठरली आहे. त्यांच्याहून काहीच वर्षे मोठी असणारी मनू.
तसे पाहता गोरीयाच्या शालेय विद्यार्थ्यांनी नेमबाजीत जिल्हा व राज्यस्तरावर नाम कमविण्याची सुरुवात 2013 मध्ये केली व शाळेतील नेमबाजीतील राज्यस्तरीय सर्वप्रथम विजेता ठरली ती अर्थातच मनू भाकर. त्यानंतर गेल्यावर्षी मनूने त्रिवेंद्रम येथील राष्ट्रीय नेमबाजीत पहिले पदक व पारितोषिक मिळविले व शालेय शिक्षणाच्या दरम्यानच मनूने नेमबाजीत मिळविलेल्या पदक आणि पदकांची संख्या तिच्या वयाएवढीच म्हणजेच 15 झाली.

मनूने नेमबाजीत अल्पवयातच राष्ट्रीय पारितोषिक मिळविल्याने तिचे राज्यभर विशेष कौतुक झाले. त्यासाठी सत्कार समारंभांचे आयोजन करण्यात आले. तिच्या गावात आणि शाळेत तर तिचा विशेष कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला व त्यातूनच मनूने गोरीयाची नेमबाजीतील परंपरा कायम राखण्यासाठी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नेमबाजीचे शिक्षण-प्रशिक्षण देण्याची कल्पना पुढे आली. साऱ्या गावाने व मनूच्या घरच्यांनी ही कल्पना उचलून धरली व त्यातूनच मनू शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्या वेळेव्यतिरिक्‍तच्या वेळात नेमबाजीचे शिक्षण- प्रशिक्षण देणारी मार्गदर्शक ठरली.

यासाठी मनूचे वडील रामकृष्ण भाकर यांनी विशेष पुढाकार घेतला. स्वतः नेमबाजीचे तरबेज-जाणकार असणाऱ्या रामकृष्ण भाकर यांनी भरीव इंजिनिअरिंगमधील आपले ज्ञान आणि अनुभवाच्या आधारे गावालगतच नेमबाजीच्या प्रशिक्षण-सरावाची व्यवस्था उपलब्ध करून दिली. एरवी सुमारे 2 लाख रुपये खर्चाची ही व्यवस्था रामकृष्ण भाकर यांच्यामुळे सुमारे 25 हजार रुपयात साऱ्या गावकीसाठी उपलब्ध झाली व गोरीयाच्या मुलांचा मनूच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचा रितसर सराव सुरू झाला. सुरुवातीला मर्यादित संख्येतच गावातील शाळकरी मुले नेमबाजी शिकण्यासाठी या मार्गदर्शन केंद्रात येत असत. त्यात मुलींची संख्या तर मर्यादितच असायची. मात्र, मनूचा अभ्यास, तिचा आत्मविश्‍वास, सराव व अल्पावधीतच तिने नेमबाजीत राष्ट्रीय स्तरावर मिळविलेले नाव- यश पाहून गोरीयाच्या मुली पण नेमबाजी शिकण्यासाठी येऊ लागल्या.

यासाठी स्थानिक पालकांनी पण प्रोत्साहनपर पुढाकार घेतल्याने मुलींची संख्या वाढू लागली व मनूच्या प्रयत्नांना त्यांच्याकडून चांगला व उत्साहवर्धक प्रतिसाद मिळू लागला. मनूच्या नेमबाजीतील तज्ज्ञ मार्गदर्शनाचा परिणाम व फायदा म्हणजे गेल्यावर्षी गोरीयाच्या 11 वर्षीय रोहन धोक्कर या मुलीने नेमबाजीतील जिल्हासतरीय पदक मिळविण्याचा विक्रम केला. त्यामुळे तर मनूचे नाव आणि काम सर्वदूर झाले असून तिला आज जझ्झर जिल्ह्यातील अनेक गावांतून नेमबाजी प्रशिक्षणासाठी बोलाविणे येत आहे. एकीकडे मनू गावाबाहेरील अन्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्रांवर पण जात दुसरीकडे आंतरराष्ट्रीय नेमबाजीचे पदक मिळविण्यासाठी पण तिचे प्रयत्न सुरूच आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)