हरित क्षेत्रातील शेतजमिनीवर कर नाही – तुकाराम मुंढे

नाशिक – नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील मोकळ्या जमिनीवर 40 पैसे स्केअर फूट दराने नवीन मालमत्ता कर लागू केला होता. या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याने मुंढे यांनी या करातून हरित क्षेत्रात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वगळले आहे.

मोकळ्या जमिनीवर 40 पैसे स्केअर फूट या प्रमाणे नवीन कर आकारल्याने महापालिका हद्दीतील शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, शहरातील हरित क्षेत्रात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीवर कर लावणार नाही, असा निर्णय मुंढे यांनी जाहीर केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय मोकळ्या जमिनीवर लागु करण्यात आलेल्या 40 पैसे स्केअरफूट करामध्ये देखील कपात करुन हा कर 20 पैसे स्केअरफूट करण्यात आला आहे. हरित क्षेत्रच नाही, तर महापालिका हद्दीत शेती करणाऱ्या कुठल्याही शेतकऱ्याला कर लागू करू नये, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)