मुंबई: आगामी काळात पर्यावरणाची हानी न करणाऱ्या हरित ऊर्जेचे महत्त्व वाढणार आहे. अशी वीज महाराष्ट्रात तयार व्हावी याकरिता आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज तर्फे सोलापूर जिल्ह्यात थर्मल पॉवर पार्क (सौर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प) उभारण्यात येणार आहे. 1200 मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता असलेल्या या पार्कची उभारणी ही तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. इंग्लंड व सिंगापूरस्थित मित्तल आयएनसी ही संस्था या पार्कच्या पहिल्या टप्प्याच्या निर्मितीसाठी अंदाजे 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्मिता शितोळे व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप म्हणले की नजीकच्या भविष्यात ग्रुपच्या वतीने मीडिया, साखर उद्योग आणि पायाभूत सोयीसुविधा आदी व्यवसायांमध्ये देखील पदार्पण करण्यात येणार आहे.

याशिवाय या प्रकल्पामध्ये विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सौरऊर्जेवरील काही अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. कंपनी आर्यन्स ग्रुप ब्रॉडकास्टिंग इंजिनिअरिंग विषयक अभ्यासक्रम सुरू करणार आहे. आर्यन्स ग्रुपने मीडिया व्यवसायात 250 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरविले असून त्यातील पहिल्या टप्प्यात या सर्व वाहिन्यांसाठी लागणाऱ्या पायाभूत सोयीसुविधांमध्ये रुपये 100 कोटी इतकी गुंतवणूक लगेचच करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)