हरित इंदापूर करून स्टार रॅंकिंमध्ये येणार

रेडा- इंदापूर महाविद्यालयाने विकसीत केलेल्या बायोकल्चरमुळे ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करता आले आहे. तसेच स्वच्छता अभियानाची व्यापकता पुढील टप्प्यात वाढविण्याबरोबरच शहराचे नैसर्गिक सोंदर्य वाढविण्यासाठी हरित इंदापूर करून स्टार रॅकिंगमध्ये येण्यासाठीचा प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केले.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या प्राथमिक तयारीसाठी तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील नगरपालिकांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी आणि शासनाचे प्रतिनिधी यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती, त्यावेळी अंकिता शहा बोलत होत्या. दरम्यान, या बैठकीत शहा यांनी स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत केलेल्या विविध उपक्रमाचे पीपीटी (PPT) द्वारे सादरीकरण केले तसेच यावेळी स्वच्छता सर्वेक्षणाची इंदापूर नगरपरिषदेने राबविलेल्या उपक्रमांची 27 मिनिटाची व्हिडीओ क्‍लिप दाखविण्यात आली. या प्रकारचे सादरीकरण करण्याचा बहूमान इंदापूर व लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मिळाला होता.
इंदापूर नगरपरिषदेने स्वच्छता अभियानांतर्गत झालेल्या स्पर्धेत प्रतिकूल परीस्थितीत देखील उत्कृष्ट कामगिरी करत हे अभियान यशस्वी करून देशात 68 वा क्रमांक संपादन करून पहिल्या 100 मध्ये येण्याचा बहुमान मिळविल्याने तसेच जादूई टोकरी तयार करून ओला कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याच्या कार्याची दखल घेवून जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांचा सत्कार केला. यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, जिल्हा प्रशासन अधिकारी दत्तात्रय लांघी तसेच जिल्ह्यातील विविध नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी उपस्थित होते.

  • पुणे जिल्ह्याची महाराष्ट्र राज्यात एक वेगळी इमेज असून स्वच्छता अभियानात आपण अग्रेसर राहून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सामाजिक चळवळ गतीमान केली पाहिजे. मुलभूत व शास्त्रीय पद्धतीने कचरा विघटन करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. स्वच्छ ऑगस्ट क्रांतीमध्ये नागरिकांनी उस्फूर्त सहभाग नोंदवून यशस्वी करावी.
    – नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे
  • स्वच्छतेची इंदापूर शहरात लोकचळवळ निर्माण झाली असून शहरातील महिला, स्वच्छता सेवक, विद्यार्थी, व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग या सामाजिक उपक्रमात नोंदविला आहे. नागरिक दररोज ज्याप्रकारे ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडीचा वापर करतात. तसेच माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सहकाऱ्याने हे अभियान यशस्वी ठरले आहे.
    – अंकिता शहा, नगराध्यक्षा, इंदापूर नगरपालिका

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)