हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविणार

पुणे – हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र ही शोधमोहीम येत्या 1 ते डिसेंबर 31 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान विनापालक मिळून आलेल्या मुलांच्या पालकांचा शोध घेणे तसेच हरवलेल्या आणि अपहरणाच्या गुन्ह्यातील मुलांचा शोध घेण्यात येणार आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलीस अधिक्षक दीपक साकोरे यांनी सांगितले.

राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. शोधमोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी बालकांसाठी काम करणाऱ्या यंत्रणा, प्रशासन तसेच पोलीस अधिकाऱ्यांची बैठक गुरूवारी पार पडली. यावेळी बालगृहे कल्याण समिती, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी, अपर पोलीस अधिक्षक तुषार पाटील, लोहमार्ग उपविभागिय पोलीस अधिकारी नंदकुमार घोरपडे, लोहमार्ग सोलापूर विभाग नंदकिशोर भोसले पाटील, महिला सहायक कक्ष प्रभारी अधिकारी दीपाली मोरे, तसेच लोहमार्ग पोलीस कर्मचारी बालकल्याण पोलीस अधिकारी कर्मचारी बैठकीस उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)