हरवलेले मूल आईला बिलगले

सोशल मीडियामुळे सहा तासांत सुखरुप परतले : शिक्रापूर येथील घटना

शिक्रापूर- सोशल मीडियाचा वापर जितका चांगला तितका वाईट असल्याचे बोलले जात असते, तर सोशल मीडियामुळे अनेक गैरप्रकार होत होत आहेत. तरी देखील पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथे बेदरलेल्या अवस्थेतील चार वर्षाचा महेश हा मुलगा सोशल मीडिया व शिक्रापूर पोलिसांच्या मदतीने सहा तासांत आईच्या कुशीत विसावला आहे.
शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथे सायंकाळी चारच्या सुमारास चार वर्षाचा बालक बेदरलेल्या अवस्थेत आई आई म्हणून रडत होता. त्यावेळी येथील विष्णू काळे यांना त्या बालकाची कीव आली. त्यांनी त्याला जवळ घेत विचारपूस केली. परंतु त्याला काही समजत नसल्याने तो त्याचे नाव महेश आणि त्याच्या वडिलांचे नाव अशोक पवार या व्यतिरिक्‍त काहीही बोलत नव्हता. त्यानंतर काळे यांनी त्याला खाऊ देत, विचारपूस केली. त्यांनतर शिक्रापूर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मनोज निलंगेकर, सोमनाथ दिवटे, पोलीस नाईक विजय गाले यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. या बालकाला ताब्यात घेऊन बजरंगवाडी येथील अनेक ठिकाणी या मुलाबाबत चौकशी केली. तसेच मुलाला घेऊन पसिरात फिरविले. परंतु या बालकाबाबत काहीही माहिती मिळत नसल्याने अखेर पोलीस उपनिरीक्षक मनोज निलंगेकर यांनी महेशचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करून शिक्रापूर परिसरातील सर्व नागरिकांना पुढे पाठविण्याचे आवाहन केले. सायंकाळी सातच्या सुमारास फोटो सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर रात्री नऊच्या दरम्यान शिक्रापूर, चाकण चौकातील एका भेळवाल्याजवळ महेशची आई जाऊन माझा मुलगा हरवला आहे. मला शोधायला मदत करा, अशी विनवणी करू लागली. त्यावेळी एका युवकाने महेशच्या आईला काही वेळापूर्वी व्हॉटसऍपवर आलेला फोटो दाखविला. त्यावेळी तिने आक्रोश केला. या युवकाने महेश हा शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात असून शिक्रापूर पोलीस त्याच्या आई वडिलांचा शोध घेत असल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी महेशची आई संगीता पवार व वडील अशोक पवार यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले. त्यावेळी महेशला पाहून तिने आक्रोश केला व तिला महेश सापडल्याचे पाहून भावना अनावर झाल्या. मुलगा सुरक्षित असल्याने शिक्रापूर पोलिसांचे आभार मानले. यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मनोज निलंगेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलीस नाईक विजय गाले, विष्णू काळे, बंटी बोबडे, महेशची आई संगीता व वडील अशोक पवार उपस्थित होते.

  • मी आजपासून दारूच सोडणार
    शिक्रापूर येथे हरविलेला मुलगा हा त्याच्या वडिलांच्या दारूच्या नशेमुळे हरविला होता. शोधाशोध घेतल्यानंतर तो शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात सुखरूप मिळून आला ,महेशचे आई वडील शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आले असताना दारूमुळेच मला माझा मुलगा गमाविण्याची वेळ आली होती. परंतु तुमच्यासारख्या देव माणसामुळे माझा मुलगा मला मिळाला आहे, हे सगळे दारूमुळे झाले आहे. म्हणून आता मी आजपासून दारू सोडून देणार आहे. कधीच दारू पिणार नाही, असे महेशचे वडील अशोक पवार यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)