हरवलेले मंगळसूत्र पोलिसांकडून पर्यटक महिलेस परत

पाचगणी, दि. 4 (प्रतिनिधी)- बेंगलोर येथून पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटक महिलेचे हरवलेले सहा तोळे सोन्याचे मंगळसूत्र पाचगणी पोलिसानी शोधून दिले.
याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, गुरेघर (ता. महाबळेश्वर) येथे हॉटेल ओईओमध्ये विरुनिका लक्ष्मण कुमारदेवी (रा. बेंगलोर कर्नाटक) निवासासाठी थांबल्या होत्या. कुमारदेवी आपल्या कुटुंबासह पाचगणी- महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. पाचगणी, भिलार येथे पर्यटन झाल्यावर त्यांनी गुरेघर येथे हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. दुसरे दिवशी हॉटेलचे बिल भागवून कुमारदेवी या पुढे महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी गेल्या. तेथे पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आले की आपल्या गळ्यातील मंगळसूत्र नाही. त्यांना वाटले ते हॉटेलमध्येच राहिले. त्यामुळे ते सर्वजण परत गुरेघरला आले. हॉटेलमध्ये ज्या रूमवर राहिल्या तेथे शोधाशोध केल्यावर तिथे त्यांना मंगळसूत्र सापडले नाही. स्टाफकडे चौकशी केली परंतु त्यांनाही मिळाले नाही म्हणून त्या पाचगणी पोलीस ठाण्यात आल्या.
सपोनि तृप्ती सोनावणे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व सहाय्यक फौजदार कुलकर्णी, फडतरे, येवले, मंडले, अभिजित घनवट यांना सूचना दिल्या. या टीमने गुरेघर येथिल हॉटेलवर जाऊन हॉटेलच्या स्टाफकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्यांनी पोलिसी भाषेत विचारपूस केल्यावर हॉटेलच्या स्टाफने सापडलेले मंगळसूत्र परत केले. पोलिसानी ते संबंधित महिला विरुनिका यांना परत दिले. विरुनिका यांनी पोलिसांचे आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)