हरवलेली पाखरे येतील का? (प्रभात open house)

हरवलेली पाखरे येतील का?
पुन्हा भेटायला..
गेलेले दिवस येतील का?
पुन्हा सजवायला…
एकत्र राहून खूप खूप हसलो. .
खूप खूप खेळलो…
शेवटच्या दिवशी मात्र
खूप रडलो…
पाहिलं आपण एकमेकांच्या डोळ्यांत
सजलेलं गाव. ..
कधीच विसरू नका आपल्या. .
मित्र-मैत्रिणींच नाव. ..
जगाच्या कानाकोपर्‍यात
कुठेही जाऊ. .
एकमेकांना काही सेकंदासाठी
आठवून पाहू…
खरचं….हरवलेली पाखरे
येतील का पुन्हा भेटायला?
आठवणीतील ते दिवस
पुन्हा सजवायला? ..

– संगीता कुलकर्णी (लेखिका/कवयित्री)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)