हरयाणात क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या

सोनीपत : हरयाणाच्या सोनीपत जिल्ह्यात क्रिकेट प्रशिक्षकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सुमीत बधवार असे हत्या झालेल्या प्रशिक्षकाचे नाव आहे. दरम्यान, या हल्ल्यात प्रशिक्षकाचा जागीच मृत्यू झालेला आहे. बाईकवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी सुमीतच्या डोक्यात ३ तर अंगावर दोन गोळ्या झाडल्या आणि  घटनास्थळावरुन पोबारा केला. या घटनेची तातडीने दखल घेत हरयाणा पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

सुमीतने दोन महिन्यांपुर्वीच खारखोडा गावातील प्रताप हायस्कुलमध्ये क्रिकेट प्रशिक्षकाची नोकरी स्विकारली होती, असे सांगण्यात येत आहे. मंगळवारी आपल्या शाळेतील संघासोबत सराव झाल्यानंतर सुमीत घराकडे जात असताना दोन हल्लेखोरांनी सुमीतवर जीवघेणा हल्ला केला आहे. सुमीतच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे गावात सर्वांशी चांगले संबंध होते. कोणासोबतही त्याचे भांडण झालेले नव्हते, त्यामुळे त्याची हत्या कोणी का करेल हे कोडं आहे. सध्या पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)