हरमनप्रीत कौर आयसीसीच्या महिला संघाची कर्णधार

दुबई: भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला आयसीसीने आयसीसीच्या टी-20 महिला संघाची कर्णधार घोषित केले आहे. तर या संघात स्म्रुती मंधाना आणि पूनम यादव यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. तर एकदिवसीय संघाची कर्णधार म्हणून न्यूझीलंड संघाची सुझी बेट्‌सची निवड करण्यात आली असून यासंघात देखील मंधाना आणि यादव यांनी स्थान मिळवले आहे.

या दोन्ही संघाची निवडही अंजुम चोप्रा, लिसा स्थालेकर, शार्लोट एडवर्डस आणि काही पत्रकारांच्या निवड समितेने केला आहे. 2018 या कॅलेंडर वर्षात केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याची निवड करण्यात आले आहे. वेस्ट इंडिज येथे पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहचवण्यात हरमनप्रीत कौरने मोठी भूमिका बजावली होती. या स्पर्धेत तिने 160. 5 च्या स्ट्राईक रेटने 183 धावा ठोकल्या होत्या. तर पूर्ण वर्षात 25 टी- 20 सामने खेळताना तिने 663 धावा जमविल्या आहेत. महिला फलंदाजाच्या टी-20 क्रमवारीत हरमनप्रीत कौर तिसऱ्या स्थानी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत बोलताना कौर म्हणाली, खरे सांगायचे झालं इतर या निवडीमुळे मला आश्‍चर्याचा धक्काच बसला आहे. कारण मागील वर्षात आम्हाला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे भारतीय संघात आपण टी- 20 विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकतो याचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली होती. मला जो सन्मान मिळाला आहे त्याचे सर्व श्रेय संपूर्ण संघचालका जाते, असेही कौर यावेळी म्हणाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)