दुबई: नुकत्याच झालेल्या महिला टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचे आव्हान उपान्त्यफेरीत जरी संपुष्टात आले असले तरी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या दृष्टीने चांगली बातमी आली असून हरमनप्रीतला तीच्या कारकिर्दीतील सर्वोच्च मानांकन मिळाले असून तीने टी-20 खेळाडूंच्या मानांकनात तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
भारतीय महिला संघातील सलामीवीर संती मंधनादेखिल आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च अश्या दहाव्या स्थनी पोहोचली आहे. तर, नवोदित जेमिमा रॉड्रीक्झही आपल्या कारकिर्दीतील आतापर्यंतच्या सर्वोत्तम अश्या सहाव्या स्थानी पोहोचली असून. भारताची अनुभवी खेळाडू मिताली राजही नवव्या स्थानी आहे. त्यामुळे पहिल्या दहा खेळाडूंमध्ये भारतीय संघातील खेळाडूंचा दबदबा असल्याचे यातून दिसून येते आहे. तर, गोलंदाजांच्या मानांकनात पूनम यादव ही 662 गुणांसह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा