हरभरा खरेदी केंद्र जामखेडला सुरू करा

जामखेड – पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी हरभरा खरेदी केंद्र खर्डा येथे सुरू केले आहे. हरभरा केंद्र हे जामखेड शहरात सुरू झाले पाहिजे अन्यथा शेतकऱ्यांचा हरभरा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या घरासमोर आणून टाकण्यात येणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रास्तारोको आंदोलनादरम्यान दिल्या.

दरम्यान, बुधवारी (दि. 21) दुपारी खर्डा चौकात राष्ट्रवादी कॉंग्रेसने आंदोलन केले. यावेळी गाड्यांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश संघटक राजेंद्र कोठारी, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय वारे, माजी जि. प. सदस्य प्रा. मधुकर राळेभात, शहाजी राळेभात, विश्‍वनाथ राऊत, शरद शिंदे, सुरेश भोसले, अमित जाधव, प्रा. राहुल आहिरे, राजेंद्र गोरे, पवन राळेभात, उमर कुरेशी, नरेंद्र जाधव, प्रकाश काळे, सुनील सुदाफुले, बिभीषण परकड, संतोष निगुडे, हरिभाऊ आजबे, संभाजी राळेभात, समीर पठाण, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कोठारी म्हणाले की, तालुक्‍यात यंदा हरभरा उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून, शासनाचे खरेदी केंद्र मात्र एकच आहे ते ही खर्डा येथे. खर्ड्याला विक्रीसाठी हरभरा घेऊन जाणे तालुक्‍यातील शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. तसेच, हे केंद्र शेतकऱ्यांची संस्था कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत चालविण्यात यावे, अशी मागणी केली.
माजी जि. प. सदस्य राळेभात म्हणाले, “”शेतकऱ्यांची एक प्रकारे ही पिळवणूक असून, भाजपा सरकारचा मनमानी कारभार झाला आहे. शासनाची खरेदी हमीभाव केंद्र पालकमंत्र्यांच्या जवळच्या खासगी संस्थेला चालवावयास दिल्याने तेथे मोठा सावळा गोंधळ होत आहे. तरी खरेदी केंद्र हे खर्डा व जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडेच ठेवावे. तसेच अरणगाव, पाटोदा, डोणगाव, साकत, चौंडी या परिसरातील शेतकऱ्यांना खर्डा हे केंद्र वाहतुकीच्या दृष्टीने गैरसोयीचे आहे. मागील उडीद खरेदी केंद्र ज्या संस्थेला दिले त्या संस्थेकडून कामकाजाची अनियमितता झाली. शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचे आरोप झाले. त्याच संस्थेला हरभरा खरेदी केंद्र दिले आहे. हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)