हरभरा उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान (भाग २)

हरभरा उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान (भाग १)

हरभरा पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी पुढील तंत्रज्ञानाचा वापर करावा.
* जमीन : हरभऱ्याच्या लागवडीसाठी, मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार जमीन निवडावी. ओल टिकवून ठेवणाऱ्या व निचऱ्याच्या जमिनीत हे पिक चांगले येते. साधारणतः6.5 ते 8.5 सामू असणाऱ्या जमिनीत हरभरा पिक चांगले येते. हलकी किंवा भरड , पाणथळ , चोपण किंवा क्षारयुक्त जमीन हरभरा पिकासाठी अजिबात निवडू नये.वार्षिक 600 ते 1000 मि.मी. पर्जन्यमान असणाऱ्या भागात मध्यम ते भारी जमिनीत हरभरा चांगला येतो. पाणी साठवून ठेवणाऱ्या जमिनीत हे पिक उभळते.
* हवामान : हरभरा पिकास थंड व कोरडे 
हवामान, स्वच्छ सुर्यप्रकाश व पुरेसा ओलावा आवश्‍यक असतो व असे वातावरण पिकास चांगले मानवते. विशेषतः पिक 20 दिवसांचे झाल्यानंतर किमान तापमान सर्वसाधारणतः10 ते 15 अंश सें. ग्रे. आणि कमाल तापमान 25 ते 30 सें. ग्रे. असेल, तर पिकाची वाढ चांगली होऊन भरपूर फांद्या, फुले आणि घाटे लागतात.
* माती परीक्षण : ज्या जमिनीत हरभरा पिक घ्यायचे आहे त्या जमिनीत स्क्रू आगर किंवा कुदळ/फावडे/खुरप्याच्या सहाय्याने 15 ते 20 सें.मी. खोलीपर्यतचा नमुना घ्यावा.
माती परीक्षणावर आधारित खतांच्या शिफारशी व अपेक्षित उत्पादन मिळविण्याचे तंत्राचा वापर करावा.प्रत्यक्ष माती परीक्षणावरून खतांच्या मात्रा खालील समिकरणाद्वारे काढाव्यात.
* हरभरा:
* जमीन- मध्यम काळी माती परीक्षण अहवाल- उपलब्ध नत्र-190 कि/हे, स्फुरद-14 किलो व पालाश-500 किलो/हेक्‍टर.
* पूर्व मशागत : आधीचे पिक निघाल्यानंतर जमिनीची खोलवर नांगरणी करून घेऊन कुळवाच्या 2 पाळ्या द्याव्यात. एकरी 2 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.
* पेरणीची वेळ : कोरडवाहू क्षेत्रात जेथे पाण्याची अजिबात सोय नसेल तेथे हरभऱ्याची पेरणी 25 सप्टेबर नंतर जमिनीची ओल कमी होण्यापूर्वी करावी. बागायती हरभऱ्याची पेरणी 20 ऑक्‍टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत करावी. उशिरा पेरणी केल्यास उत्पादनामध्ये घट येऊ शकते.
* हरभरा पिकासाठी स्थानिक, उन्नत व सुधारित वाण: 
विजय पिकाचा कालावधी(दिवस):जिरायती – 85 ते 90 व बागायती क्षेत्रात 105 ते 110 दिवस. उत्पादन (क्विं/हे)-जिरायती-14-15, बागायती-35-40 तर उशिरा पेरणी 16-18 क्विंटल /हे.
* वैशिष्ट्‌ये : अधिक उत्पादनक्षम, मररोग प्रतिकारक, बागायती तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य वाण.
विशाल पिकाचा कालावधी(दिवस) :जिरायती 85 ते 90 व बागायती क्षेत्रात 105 ते 110 दिवस
उत्पादन (क्विं/हे)- जिरायती-14-15, बागायती-35-40 तर उशिरा पेरणी 16-18 क्विंटल /हे.
वैशिष्ट्‌ये: अधिक उत्पादनक्षम, मररोग प्रतिकारक, बागायती तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य वाण.
दिग्विजय पिकाचा कालावधी(दिवस): जिरायत- 90 ते95 बागायत-110 ते 115
उत्पादन (क्विं/हे)- जिरायती-14-15, बागायती-30-35, उशिरा पेरणी-20-22
वैशिष्ट्‌ये : आकर्षक टपोरे पिवळसर दाणे, अधिक उत्पादनक्षम, मररोग प्रतिकारक, बागायती तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य वाण.महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित.
विराट :पिकाचा कालावधी(दिवस): 110 ते 115 दिवस
उत्पादन (क्विं/हे) : जिरायती-10 12ते , बागायती-30-32
वैशिष्ट्‌ये : काबुली वाण, अधिक टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, बागायती तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य वाण. महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित.
फुले विक्रम पिकाचा कालावधी (दिवस) : 110 ते 115 दिवस
उत्पादन (क्विं/हे) -जिरायत-16 ते 18 , बागायत- 35ते40 , उशिरा 20ते 22
वैशिष्ट्‌ये : उंच वाढणारा व अधिक उत्पादन देणारा, फ्युजारियम मर रोगास प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणी व यांत्रिक पद्धतीने काढणीस योग्य वाण.
* बियाणाचे प्रमाण व पेरणीची पद्धत: 
देशी हरभऱ्याची पेरणी दुचाडी पाभरीने करावी. दोन ओळीत 30 किंवा 45 सें.मी.व दोन रोपात 10 से.मी. अंतरावर होईल असे ट्रॅक्‍टरवर चालणा-या पेरणीयत्राद्वारे किंवा बी.बी.एफ. यंत्राने करावी. जातीपरत्वे पेरणीसाठी 65 ते 100 किलो बियाणेप्रति हेक्‍टरी वापरावे.
भारी जमिनीत हरभऱ्याची पेरणी सरी वरंब्यावर 90 से.मी. अंतरावर साऱ्या सोडून बियाणे सरीच्या दोन्ही बाजूस 10 से.मी. अंतरावर टोकण पद्धतीने लागवड करावी. त्याचप्रमाणे हरभ-याची रुंद वाफा सरी यंत्राने सुद्धा लागवड करता येते. काबुली वाणांसाठी जमीन ओलावून लागवड केल्यास चांगली उगवण क्षमता मिळते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)