हरभरा उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान (भाग १)

भारत हा कृषि प्रधान देश असून देशाची अर्थव्यवस्था सुदृढ ठेवण्यामध्ये कृषि क्षेत्राचा फार मोठा वाटा आहे. हरभरा हे भारताचे तसेच महाराष्ट्रातील एक महत्वाचे कडधान्य आहे. हरभरा पिक देशातील सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये घेतले जाते. कडधान्य पिके हि प्रथिनांचे प्रमुख स्रोत आहेत. अशा प्रकारे डाळीमधील प्रथिनांचे मानवी आहारामध्ये अनन्यसाधारण महत्व असून मानवाचे शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी फार उपयोगी आहेत.

सध्या हरभरा पिकाचे उत्पादन घेण्यासठी विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. सध्य स्थितीत हरभऱ्याचेजास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी उच्च गुणवत्ता असलेल्या सूधारित बियाण्याचा वापर, प्रति एकर योग्य झाडांची संख्या, योग्य लागवडीची पद्धत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक तण नियंत्रण, एकात्मिक कीड व रोगांचे व्यवस्थापन तसेच योग्य साठवण तंत्रज्ञान यांचा एकात्मिक वापर करून हरभऱ्याचे उत्पादन वाढविणे सहज शक्‍य आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र राज्यात कडधान्य पिक45.95 लाख हेक्‍टर क्षेत्रावर घेण्यात येत असून हरभऱ्याचे उत्पादन 44.71 लाख टन तर उत्पादकता 973किलो प्रति हेक्‍टर आहे(2016-17). भारतात कडधान्य पिकाची लागवड264.00 लाख हेक्‍टर क्षेत्रावर होत असून त्यापासून 221.40 लाख टन उत्पादन मिळते आणि उत्पादकता 838 किलो प्रति हेक्‍टर इतकी आहे. म्हणजे देशाच्या एकूण कडधान्य उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा16.93 टक्के आहे. कडधान्य पिक घेण्यात कडधान्य पिकांचे मानवी आहारात व शेतीमध्ये अतिशय महत्वाचे स्थानआहे. कडधान्य पिके हि जमिनीचा कस सुधारण्यासाठी व तो टिकवून ठेवण्यासाठी फार उपयोगी पडतात.

अहमदनगर जिल्ह्यात हरभरा पिक 86700 हे. क्षेत्रावर घेतले जात असून उत्पादन 33900 टन तर उत्पादकता 739 कि/हे इतकी आहे. (सन2015-16). अहमदनगर जिल्हा तसा अवर्षण प्रवण असून हरभऱ्याचे पिक जिल्ह्यात मुख्यत्वे कोरडवाहू म्हणून घेतले जाते. यावर्षी जिल्ह्यात फारच कमी प्रमाणात झाला आहे. त्यामुळे कमी पाण्याचे पिक म्हणून हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्‍यता आहे.त्यासाठी शेतक-यानी केवळ पारंपारिक पद्धतीने पिक न घेता पिकांचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन केल्यास कोरडवाहू क्षेत्रात सुद्धा हरभऱ्याचे चांगले उत्पादन घेणे सहज शक्‍य आहे.

* हरभरा या पिकाची हेक्‍टरी उत्पादकता कमी असण्याची प्रमुख कारणे :
1. चांगले उत्पादन देणाऱ्या वाणांचे बियाणे सामान्य शेतकऱ्यांना सहजासहजी उपलब्ध न होणे.
2. गहू, ज्वारी, कापुस, ऊस, भाजीपाला इ. पिकांना प्रथम प्राधान्य देऊन राहिलेली दुय्यम दर्जाची जमीन या पिकासाठी घेतली जाते.
3. पेरणीची वेळ, हेक्‍टरी रोपांची संख्या, पूर्व मशागत, बियाण्याचे हेक्‍टरी प्रमाण, तण नियंत्रण इ. बाबत योग्य दक्षता घेतली जात नाही.
4. परंपरागत पद्धतीमध्ये नांगराच्या मागे बियाणे टाकून पेरणी केली जाते. त्यामुळे पूर्व मशागत चांगली होत नाही व रोपांची संख्या कमी राहते आणि परिणामी उत्पादन घटते.
5. उर्वरित ओलाव्यावर घेतले जाणारे पिक दाणे भरण्याच्या व पक्वतेच्या अवस्थेत पाण्याच्या ताणास बळी पडते व उत्पादनात मोठी घट होते.
6. खताची अयोग्य मात्रा व ते फेकून देण्याची चुकीची पद्धत यामुळे पिक पोषण दुर्लक्षित राहते.
7. रोग-किडींच्या बंदोबस्तासाठी योग्य काळजी घेतली जात नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)