हरभजन माफी मागताना रडला- सायमंड्‌स

पर्थ: ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अँड्रयू सायमंड्‌स याने फॉक्‍स स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंग हा ‘मंकी गेट’ प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी माफी मागताना रडला होता.
भारत-ऑस्ट्रेलिया 2008 दौऱ्याच्या सिडनी कसोटी वेळी हरबाजां सिंग ने काही सायमंड्‌सला बाद केल्यावर जल्लोषात काही टिपण्णी केली होती. सायमंड्‌सला तो उच्चार व्यवस्थीत समजला नाही. त्याला वाटले हरभजनने त्याला ‘मंकी’ म्हटले आहे. त्यावर सायमंड्‌सने सामना अधिकाऱ्याकडे हरभजनने वर्णभेदी टिप्पणी केल्याची तक्रार नोंदवली होती. त्यावेळी हरभजनला तीन कसोटी सामने बंदीची शिक्षा झाली होती. भारताच्या संघ व्यवस्थापनाने याचा निषेध करत पुन्हा सुनावणी घेण्याचा आग्रह केला . हे सर्व प्रकरण ‘मंकी गेट’ प्रकरण म्हणून ओळखले जाते.

या आठवणीबाबत पुढे बोलताना सायमंड्‌सने सांगितले की, आम्ही एका श्रीमंत व्यक्तीच्या येथे जेवण्यास गेलो होतो. आमचा संपूर्ण संघ होता आणि तेथे हरभजन देखील पाहुणा होता. जेवणानंतर त्याने काही वेळ बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने माझी आणि माझ्या कुटुंबाची माफी मागितली. माझ्या विधानामुळे तुला आणि तुझ्या कुटुंबियांना  काही त्रास सहन करावा लागू नये असेही तो म्हणाला.तो माफी मागताना रडत होता. मला जाणवत होते की, त्याच्या खांद्यावर किती मोठी ओझे या प्रकरणामुळे निर्माण झाले होते. बोलणे झाल्यावर वर आम्ही हस्तादोलन केले आणि नंतर मी त्याची गळाभेट घेतली आणि म्हणालो, मित्रा, आता सर्व काही ठीक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सायमंड्‌स हा इंग्लडमध्ये जन्माला होता. त्याच्या पालकातील एक व्यक्ती वेस्ट इंडियन आहे. मंकी गेट  प्रकरणाचा त्याच्या कारकिर्दीवर  कसा परिणाम झाला हे सांगताना सायमंड म्हणाला, या प्रकरणानंतर मी खूप दारू प्यायला लागलो. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माझा करार संपुष्टात आणला आणि मला 2009 च्या टी -20 विश्वचषकात देखील स्थान दिले नाही. त्या एका प्रकरणामुळे माझे क्रिकेटचे सारे विश्व बदलले होते, असेही तो यावेळी म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)