वाल्हे – पुरंदर तालुक्‍यातील हरणी विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यार्थी शिक्षक बनले होते व त्यांनी विद्यालयाचे कामकाज दिवसभर पाहिले. मुख्याध्यापक मधुकर जगताप, ज्ञानदेव सुतार, हरिभाऊ टापरे, सतिश पिसाळ, रामदास जगताप, सुरेश जगताप, बाळासाहेब पठारे, प्रियांका समगीर, विजय जगताप आदी शिक्षकांचा सन्मान संस्थेचे विश्वस्त प्रा. डॉ. महादेव जाधव, शिवाजी ढमढेरे, व्यवस्थापक कानिफनाथ अमराळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एकनाथ यादव, सरपंच स्वाती यादव, सुवर्णा यादव, अमोल यादव व अनिल यादव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)