हरणी मध्ये शालेय साहित्याचे वाटप

परिंचे- हरणी (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये शालेय साहित्याचे वाटप परिंचे गावचे सरपंच समीर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. गरीब व गरजू मुलांच्या शैक्षणिक कार्यात हातभार लावण्याच्या उद्देशाने गावातील उद्योजक अशोक रामचंद्र यादव यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप केले. या वह्या वाटपाचा शाळेतील 60 मुलांना लाभ मिळाला असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय खैरे यांनी सांगितले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय पाटसकर उपस्थित होते. यावेळी सरपंच राजेंद्र यादव, ग्रामपंचायत सदस्य राहुल यादव, रवींद्र यादव, विठ्ठल यादव, दिनकर यादव, विद्या यादव, नवनाथ यादव, गिरिश यादव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार नंदकुमार कामाठे यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)