हरणाच्या पाडसाला यवतमध्ये जीवदान

यवत -येथील गावच्या हद्दीत असलेल्या माणकोबावाडा परिसरात कुत्र्यांच्या तावडीतून तरुणांनी हरणाच्या पाडसाला वाचवून वनविभागाच्या ताब्यात देऊन त्या पाडसाला जीवदान दिल्याची घटना मंगळवारी (दि. 20) घडली आहे.

सामाजिक बांधिलकी जपत असताना निसर्ग आणि वन्यजीव यांना संभाळणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे आणि अशीच सामाजिक बांधिलकी जपणारे सामाजिक कार्यकर्ते पोपट लकडे व राहुल बिचकुले यांनी आपल्या शेतात हरणाच्या कळपातून चुकून आलेल्या हरणाच्या पाडसाला कुत्र्यांच्या तावडीतून वाचवून जखमी पाडसावर औषधोपचार करीत एक प्रकारे जीवदान दिले. राजीव गांधी राष्ट्रीय प्राणी संग्रहालय कात्रज, पुणे येथे संपर्क साधून त्यांच्या माध्यमातून उरुळी कांचन येथील वन्यजीव मित्र खलील शेख व हवेली शिवसेना तालुकाप्रमुख विजय बगाडे यांच्या मदतीने ते वनविभागाच्या ताब्यात देऊन त्या पाडसाला प्राणी संग्रहालय कात्रज, पुणे येथे पाठविण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)