हरकतींतून निवडणुकीची रंगीततालीम ; इंदरकौर गंभीर यांचा अर्ज रद्द 

गांधी, गाडे, बारस्कर आणि जाधव यांचे आक्षेप : इंदरकौर गंभीर यांचा अर्ज रद्द 

नगर: महापालिका निवडणुकीसाठी 715 अर्ज दाखल झाले असून, त्या अर्जांची छाननी आज झाली. याचबरोबर अर्जांवर हरकती घेण्यात आल्या. या हरकतींमुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दलनाबाहेर इच्छुकांमध्ये खडाजंगी होण्याचे प्रकार घडले. पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांच्या दलनाबाहेर बंदोबस्त वाढविला होता. या हरकती म्हणजे निवडणुकीची रंगीत तालीम होती, असेच काहीसे चित्र रंगले होते.

शिवसेनेचे गिरीश गांधी यांनी भाजपचे नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. या हरकतींवरून दोघांमध्ये चांगलीच जुंपली होती. राष्ट्रवादीचे संपत बारस्कर यांच्या अर्जावर भाजपचे संदीप कुलकर्णी यांनी हरकत घेतली होती. सावेडी प्रभाग कार्यालयाबाहेर जमलेला जमावांमध्ये काही बाचाबाचीचे प्रसंग घडले. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी त्याची दखल घेत बंदोबस्त वाढविला होता. प्रभाग एकमधील राष्ट्रवादीचे उमेदवार मीना चव्हाण यांच्या विरोधात त्या ओबीसी नसल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला होता. प्रतिस्पर्धी उमेदवार पार्वती तागड यांनी हा आक्षेप घेतला. त्यावर सुनावणीही झाली. निकाल चव्हाण यांच्या बाजूने गेला.

प्रभाग चारमध्ये शिवसेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांच्या विरोधात त्यांचेच चुलतभाऊ असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र गाडे यांनी आक्षेप घेतला होता. यश पॅलेस येथील बेकरी बेकायदेशीर असल्याचा त्यांनी आक्षेप घेतला होता. यावर सायंकाळी सुनावणी झाल्यानंतर हरकत फेटाळण्यात आली. जितेंद्र गाडे यांना यावर आवश्‍यक वाटल्यास न्यायालयात जाण्यास सांगितले. याच प्रभागात राष्ट्रवादीने विनय वाखुरे आणि नगरसेविका इंदरकौर गंभीर या दोघांना पक्षाचे “एबी’ फॉर्म दिले होते. छाननीवेळी ही बाब लक्षात आली. या दोघांना याबाबत विचारणा करण्यात आली. पक्षातर्फे इंदरकौर गंभीर यांचा अर्ज ग्राह्य धरण्याबाबत सांगण्यात आले. मात्र नियमानुसार ज्याचा अर्ज अगोदर आला, त्यांचा ग्राह्य धरता येतो. यात वाखुरे यांचा अर्ज अगोदर आल्याने त्यांचा ग्राह्य धरण्यात आला. इंदरकौर गंभीर यांचा अर्ज यामुळे रद्द झाला.

प्रभाग नऊमध्ये नीलेश म्हसे यांनी “क’ गटातील सर्वच उमेदवारांच्या अर्जावर हरकत घेतली. शपथपत्र योग्य भरले नसल्याचा त्यांचा आक्षेप होता. याच प्रभागातील भाजपचे उमेदवार परदेशी यांच्या विरोधात अनधिकृत बांधकाम असल्याची तक्रार कैलास शिंदे यांनी केली होती. प्रभाग 10 मधील बसपचे उमेदवार अक्षय उनवणे यांनी दीप चव्हाण यांच्या अर्जावर हरकत घेत अनधिकृत बांधकाम असल्याचे म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)