हयात हॉटेलची तोडफोड; दहा जणांना पोलीस कोठडी

हिंजवडी पोलिसांनी अटक केलेल्यांची रवानगी कोठडीत


सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केलेल्यांना जामीन

 

पुणे- आरक्षणाच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान हॉटेल हयात येथे केलेल्या तोडफोड प्रकरणी येरवाड पोलीसांनी दहा जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.
भास्कर रामराव भोसले (वय 51, रा. येरवडा), आशिष यशवंत शिर्के (वय 21, रा. नागपूर चाळ), चंद्रकांत शशिकांत भोसले (वय 48, रा. रामनगर, येरवडा), शशिकांत चंद्रकांत बाराते (वय 24, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), सचिन दिनकर भोसले (वय 47), दिलीपसिंह अष्टभुजा ठाकुर (वय 27), प्रमोद रविकांत जाधव (वय 28), प्रशांत कृष्णा मोरे (वय 32, चौघेही, रा. येरवडा), किशोर यशवंत काटकर (वय 50, रा. बी.टी.कवडे रस्ता, घोरपडी), यशवंत ऊर्फ सुनील भानुदास मोरे (वय 50, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी इतर 5 ते 10 जणांवर गुन्हे दाखल केला आहे. याबाबत सेतुरामन शणमुख सुंदरम (वय 38, रा, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फिर्यादी हे हयात हॉटेल येथे नोकरीस आहेत. 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान दुपारी 2 वाजता 8 ते 10 दुचाकीवरून 15 ते 20 जण हातामध्ये काठ्या, लाकडी बांबु घेवून हॉटेलमध्ये आले. त्यावेळी हॉटेल बंद का ठेवले नाही, असे म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून हॉटेलमध्ये तोडफोड केली, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. या प्रकरणी दहा जणांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली. दरम्यान हिंजवडी पोलिसांनी अटक केलेल्या आठ जणांची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली. तर सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केलेल्या सात जणांना जामीन मंजूर केला.
बचाव पक्षातर्फे पुणे बार असोसिएशनने मोफत काम पाहिले. अध्यक्ष ऍड. सुभाष पवार, ऍड. समीर घाटगे, उपाध्यक्ष ऍड. रेखा करंडे, ऍड. विजय शिंदे, ऍड. विवेक भरगुडे, ऍड. राकेश ओझा, ऍड. सचिन गेलडा आणि ऍड. नितीन झंजाड यांनी काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)