“हम चार’मध्ये झळकणार नवोदित कलाकार

राजश्री प्रॉडक्‍शन “प्रेम रतन धन पायो’ चित्रपटानंतर तब्बल तीन वर्षांनंतर नवीन चित्रपट बनणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली होती. “हम चार’ असे या चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले होते. पण यात कलाकारांचे लूक पाहायला मिळत नव्हते. या चित्रपटाचे आणखी एक नवे पोस्टर आता रिलीज करण्यात आले असून कलाकारांचे खास लूकही यात पाहायला मिळत आहेत.

4 नवोदित कलाकार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. त्यामुळे हे नवीन चेहरे प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट देखील राजश्री प्रोडक्‍शनच्या इतर चित्रपटांप्रमाणे फॅमिलीवरच आधारित असणार आहे. पण ही फॅमिली यावेळी काहीशी वेगळी असणार आहे. या चित्रपटाची फ्रेंड्‌स भी फॅमिली है, अशी टॅगलाईन आहे. या चित्रपटाची कथा 4 मित्रांच्या भोवती फिरताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक दीक्षित हे करणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चित्रपटात सिमरन शर्मा, अनशुमान मल्होत्रा, प्रित कामनी आणि तुषार पांडे हे नवोदित कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टरसोबतच प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या 15 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)