‘हम आपके हैं कौन’ च्या रिमेकमध्ये आलिया आणि वरुण यांना पाहायला आवडेल

मुंबई : ‘हम आपके हैं कौन’ या  सुपरहिट  ठरलेल्या सिनेमाचा रिमेक बनवला तर त्यात प्रेम आणि निशाच्या भूमिकेत आलिया भट आणि वरुण धवन यांना पाहायला आवडेल, असं अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी म्हंटलंय. 23 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके हैं कौन’मध्ये प्रेमची भूमिका सलमान खानने तर निशाची भूमिका माधुरी दीक्षितने साकारली होती. तर रेणुका शहाणे यांनी माधुरीच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती.

त्या पुढे  बोलताना म्हणाल्या  की,  “तरुण पीढीला डोळ्यासमोर ठेवून ‘हम आपके हैं कौन’ पुन्हा बनवला तर मला त्यातल्या व्यक्तिरेखा मॉडर्न अंदाजात पाहायला आवडतील. ‘हम आपके हैं कौन’ हा कौटुंबिक चित्रपट आहे. यात प्रत्येकाचं एकमेकांवर प्रेम आहे. सिनेमात लग्नाचं संगीत, मेहंदी यांसारखे कार्यक्रम महत्त्वाचे आहेत. या चित्रपटातील भूमिकेला  आलिया भट आणि वरुण धवन चांगला न्याय देऊ शकतील अशी मला खात्री वाटते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)