हमी भावापेक्षा कमीदरात तूर खरेदी करणार नाही – पणन मंत्री सुभाष देशमुख

मुंबई – राज्यात आतापर्यंत 12 लाख 70 हजार क्विंटल तूरीची खरेदी करण्यात आली आहे. हमीभावापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करू नये, तसेच कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सक्त सूचना बाजार समित्यांना देण्यात आल्या आहेत. कुठल्याही प्रकारे खरेदी केंद्र बंद होणार नाही. चुकारे दिले जातील, अशी माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत दिली.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील यांनी राज्यातील तूर, हरभरा, सोयाबीन, मका यांच्या खरेदीबाबतचा मद्दा सभागृहात उपस्थित केला होता. राज्यात तूर आदींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. सरकारी यंत्रणा निष्क्रिय आहे. 27 टक्केच तूर खरेदी झाली असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. केंद्र सरकारशी बोलून तातडीने आयातीवर बंदी घालण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली. केंद्र सरकारने मोझांबिक या देशासोबत तूर आयात करण्याचा पाच वर्षांचा करार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बोलून हा करार तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

या हंगामात तूर, सोयाबीन, हरभरा, मुग, उडीद खरेदी सुरू आहे. यावर्षी देखील साडे चार लाख मेंट्रीक टन तूरीची खरेदी केली जाईल. आतापर्यंत एक लाख 5 हजार शेतकऱ्यांची सुमारे 12 लाख 69 हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. मूग 54 हजार 341 क्विंटल, उडीद 5 लाख 86 हजार क्विंटल, सोयाबीन 2 लाख 62 हजार क्विंटल तर हरभरा 4 हजार क्विंटल खरेदी करण्यात आला आहे, असे पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. तसेच खरेदी केंद्र बंद राहणार नाहीत, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)