हमास संबंधी मतदानाच्यावेळी भारत अनुपस्थित 

दहशतवादाबद्दल हमासचा निषेध करणारा पहिलाच ठराव 

संयुक्तराष्ट्रे: गाझा पट्टीत हमास आणि इतर संघटनांनी केलेल्या दहशतवादी कारवायांचा निषेध करण्यासाठी अमेरिकेने संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेत आणलेल्या प्रस्तावावरील मतदानात भारताने भाग घेतला नाही. प्रत्यक्ष मतदानात हा प्रस्ताव संमत करण्यात आला. त्यात प्रस्तावाच्या बाजूने 87, विरोधात 58 मते पडली.

-Ads-

37 देशांनी मतदानावर बहिष्कारच घालणे पसंत केले. हमास संघटनेकडून इस्त्रायलच्या हद्दीत वारंवार क्षेपणास्त्र व रॉकेट हल्ले केले जातात आणि त्यांच्याकडूनच हिंसाचाराला प्रोत्साहन दिले जात असल्याने हमास व अन्य संबंधीत संघटनांचा जागतिक व्यासपीठावर निषेध होणे गरजेचे आहे या भूमिकेतून अमेरिकेने हा प्रस्ताव आणला होता. गाझातील हमास संघटनेच्या आक्रमकपणामुळे तेथे मोठा संघर्ष आणि तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यावर उपायययोजना करण्याची गरजही या ठरावात व्यक्त करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना अमेरिकेचे संयुक्तराष्ट्रांतील राजदूत निक्की हॅले यांनी म्हटले आहे की आत्तापर्यंत गाझातील हिंसाचाराच्या विरोधात इस्त्रायलचा निषेध करणारे पाचशेपेक्षा अधिक ठराव संयुक्तराष्ट्रांमध्ये संमत करण्यात आले आहेत पण एकदाही हमासला यासाठी जबाबदार धरून त्यांच्या निषेधाचा ठराव करण्यात आलेला नाही त्यामुळे हा ठराव महत्वाचा आहे. या प्रस्तावाला म्हणावा तसा पाठिंबा लाभला नाही यावर नाराजी व्यक्त करून त्यांनी म्हटले आहे की या ठरावाला पाठिंबा देऊन योग्य भूमिका घेण्याची संधी अनेक देशांना उपलब्ध होती त्याचा त्यांनी पुरेसा लाभ घेतला नाही हे दुर्देवी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)