हमास विरोधी निषेध ठरावाने इस्त्रायल समाधानी 

अमेरिकेसह जगभरातील देशांचे मानले आभार 

जेरूसलेम – संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेत अमेरिकेने गाझा पट्टीतील हिंसाचाराबद्दल हमास आणि अन्य संबंधीत संघटनांचा निषेध करणारा ठराव मांडला होता. तो ठराव बहुमताने संमत झाल्याबद्दल इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतानयाहू यांनी संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेचे आभार मानले आहेत. 87 विरूद्ध 58 मतांनी हा प्रस्ताव संमत झाला आहे. या ठरावाला पाठिंबा देऊन बहुसंख्य देशांनी हमासच्या विरोधात आम्हाला पाठिंबा दिला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत असे त्यांनी म्हटले आहे.

संयुक्तराष्ट्रांच्या सभेत पहिल्यांदाच हमासचा निषेध करणारा ठराव संमत झाल्याने मी या ठरावाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक राष्ट्रांचे मनापासून आभार मानतो असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. या साठी अमेरिकेने आणि त्यांच्या संयुक्तराष्ट्रांतील प्रतिनिधी निक्की हॅले यांनी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय होता असेही त्यांनी म्हटले आहे. संयुक्तराष्ट्रांकडून सातत्याने इस्त्रायल विरोधी भूमिका घेतली जात असल्याबद्दल हॅले यांनी पहिल्यापासूनच आक्रमक भुमिका घेतली होती. अमेरिकेसह युरोपियन समुदायातील राष्ट्रांनी हमास या संघटनेला काळ्या यादीत टाकले आहे. तथापी या प्रस्तावाला अपेक्षेनुसार दोन तृतीयांश बहुमत मिळू शकले नाही ही संयुक्तराष्ट्रांनी अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाला दिलेली मोठी चपराक आहे असे हमास या संघटनेने म्हटले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)