हमाल, माथाडींचा संप; मार्केटयार्ड ठप्प

मध्यवर्ती मंडळ स्थापन करण्यास विरोध : शेतमालाची आवक मंद

पुणे- राज्यातील 36 माथाडी मंडळांचा कारभार पाहण्यासाठी एकच मध्यवर्ती मंडळ स्थापन करण्याच्या विरोधात माथाडी कामगारांनी पुकारलेल्या एक दिवशीय लाक्षणिक बंदला मार्केट यार्डात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. नेहमीच्या तुलनेत अवघा 10 टक्के आलेला शेतीमाल, बंदामुळे कमी आलेले ग्राहक यामुळे मार्केट यार्डातील कामकाज ठप्प झाले होते.

-Ads-

हमाल पंचायत, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियन, तोलणार संघटना, महात्मा फुले कामगार संघटना, टेंम्पो पंचायत आदी संघटनांच्या वतीने कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली हा बंद पुकारण्यात अला होता. या बंदामुळे मार्केटयार्डातील फळ, तरकारी विभाग, कांदा बटाटा विभाग, फुल विभागात अगदीच नगण्य आवक झाली. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. दरम्यान, भुसार विभागात कामगारच नसल्याने दुकानांसमोर वर्दळ नसल्याची स्थिती होती. काही व्यापाऱ्यांनी तर कामगारांच्या संपामुळे दुकाने बंद ठेवली होती. तर काहींनी सुरू ठेवली होती. मात्र, मालाची विक्रीच झाली नाही. त्यांनी आपली प्रलंबित कामे करण्यावर भर दिला होता.

त्यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष अमोल चव्हाण, सचिव संतोष नांगरे, खजिनदार विलास थोपटे, सुर्यकांत चिंचवले, शशिकांत नांगरे, नितीन जामगे, दीपक जाधव, किसन काळे, विशाल केकाणे उपस्थित होते. दरम्यान, कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी अलका टॉकीज चौक येथील सेनापती बापट पुतळ्यासमोर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन जनता न्यायालय भरवले होते. त्यामध्ये जनतेच्या भूमिकेबाबत तेथील पादचारी लोकांना विचारणा करुन त्यांची मते घेण्यात आली.

आजचे आंदोलन माथाडी कायदा गुंडाळू पाहणाऱ्या सरकारच्या विरोधात आहे. असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू करण्यात आला. हा कायदा इतर राज्ये लागू करू लागले आहेत. मात्र, महाराष्ट्र हा कायदा मोडीत निघाले आहे. हा निर्णय सरकारने त्वरित मागे घ्यावा. अन्यथा सर्व कष्टकरी रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र करतील.
डॉ. बाबा आढाव, कामगार नेते.

 

 

संप काळामध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाची विक्री करण्याची व्यवस्था बाजार समितीकडून करण्यात आली होती. संपाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
– दिलीप खैरे, सभापती, बाजार समिती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)