हबीबउर रहमानला एनआयए कडून अटक

नवी दिल्ली – लष्कर ए तोयबाशी संलग्न असलेल्या हबीबउर रहमान या संशयित दहशतवाद्याला नॅशनल इन्व्हेस्टींग एजन्सीने दिल्ली विमानतळावर अटक केली. त्याला सौदी अरेबियांने त्यांच्या देशातून हद्दपार केल्यानंतर त्याला दिल्लीच्या विमानतळावर अटक करण्यात आली. तो भारतात येत असल्याची माहिती सौदीच्या सरकारकडून भारत सरकारला देण्यात आली होती.

रहमान हा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी शेख अब्दुल नईम याचा हॅंडलर म्हणून काम करीत होता. नईम हा सन 2014 साली पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. त्याला पुन्हा नोव्हेंबर 2017 मध्ये अटक करण्यात आली आहे. त्याच्या मार्फत भारतात दहशतवादी कारवाया करण्याची कारस्थाने रहमान यानेच केली होती. नईमसाठी राहण्याची व्यवस्था तसेच त्याच्या निधीची व्यवस्था याच रहमानने केली आहे असे एनआयएचे म्हणणे आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)