हनुमान हे खेळाडू होते; भाजप मंत्र्यांचा दावा 

लखनऊ – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमानाचा दलित आणि वंचित असा उल्लेख केल्यानंतर यावर अनेक नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली. यामध्ये आणखी एक नाव जोडले गेले आहे. हनुमान हे खेळाडू होते, असा दावा माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांनी केला आहे. एका चर्चासत्रात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

हनुमान कोण होते, याबाबत बोलताना चेतन चौहान यांनी कोणत्याही जातीचा उल्लेख न करता म्हणाले कि, हनुमान कुस्ती खेळत होते म्हणून ते खेळाडू होते. सर्व पैलवान हनुमानाची  करतात. माझ्यासाठीही ते पूजनीय आहेत.  देवाची कुठलीही जात-पात नसते, त्यामुळे मी त्यांना कुठल्याही जातीच्या चौकटीत बांधू इच्छित नाही, असेही चौहान यांनी आवर्जून सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, भाजपा आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान मुसलमान असल्याचा दावा केला होता. तर भाजपाचे कॅबिनेट मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी हनुमान जाट असल्याचा दावा केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)