हनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार

जयपूर: भाजपचे राजस्थानमधील अलवर येथील आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी पुन्हा एक विचित्र वक्तव्य केले आहे. रामभक्त हनुमान हा जगातील पहिला आदिवासी होता, असा दावा त्यांनी केला आहे. हनुमान हा आदिवासींसाठी पूजनीय आहे. कारण आदिवासींना एकत्रित आणून त्यानं सेना तयार केली होती आणि त्या सेनेला भगवान रामचंद्रांनी प्रशिक्षित केले होते, असेही ते म्हणाले.

दलित संघटनांनी २ एप्रिलला भारत बंद केले होते. या आंदोलनादरम्यान हनुमानाच्या प्रतिमेचा अवमान झाला होता. तो व्हिडिओ पाहून खूपच दुःखी झालो. हनुमानाला आदिवासी देव मानतात. हनुमानाच्या प्रतिमेचा अपमान का केला हेच समजले नाही. ही बाब खूपच दुर्दैवी आहे, असेही आहुजा म्हणाले.

आहुजा यांनी याआधीही अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. जेएनयू कॅम्पसमध्ये दररोज तीन हजार कंडोम आणि दोन हजार दारुच्या बाटल्या सापडतात, असा दावा त्यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये केला होता. तर गोहत्या आणि गोतस्करीत सहभागी असलेल्यांना मारले पाहिजे, असे ते गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये म्हणाले होते. या वक्तव्यावरून त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका झाली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)