हनुमान, वानरसेना हे नाव नसून गोत्र

नगर – वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण यासह अन्य रामायाणात असणाऱ्या उल्लेखात रावणासोबत झालेल्या युध्दात लढणारे हनुमान, जटायू, अस्वल आणि अन्य प्राणी (वानरसेना) हे नाव नसून गोत्र आहेत. हे गोत्र आजही समाजाच्या विविध जाती-धर्मामध्ये आढळतात. यामुळे हनुमान हे कोणत्या गोत्राचे आहेत, हे तुम्हीच ठरवा, असे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी पुनरुच्चार केला. तसेच सरकार आणि प्रशासनाच्या यांच्या निष्काळजीपणा आणि दुर्लक्षातून नक्षलवादाचा जन्म होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील आदिवासी समाजाच्या जागेसह अन्य तक्रारीवर प्रत्यक्षात पाहणीसाठी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष व सदस्य नगरमध्ये दोन दिवसीय दौऱ्यावर होते. जिल्हा प्रशासनाची बैठकीनंतर साय हे पत्रकारांशी बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साय म्हणाले, “सरकार, प्रशासन आणि समाजाच्या दुर्लक्षामुळे नक्षलवाद निर्माण होतो. आदिवसी समाजाला सोयी सुविधा न दिल्यास त्यातून ते नक्षली बनतात. त्याच सोबत काही वर्ग आदिवासी समाजाला भडकवून तुम्हला सुविधा दिल्या जात नाही, असे त्यांच्यावर बिंबवून त्यांना नक्षलवादाकडे वळवितात.’ काही दिवसांपूर्वी हनुमान हे आदिवासी समाजाचे असल्याचा दावा साय यांनी केला होता. यावर आता राजकारण सुरू झाले का? याबाबत साय यांना विचारण्यात आले. त्यावर साय म्हणाले, “रामायणात असणाऱ्या उल्लेखात रावणासोबत लढणारे हनुमान आणि अन्य प्राणी यांचे नाव नसून त्यांचे गोत्र आहेत. आजच्या समाज व्यवस्थेत हे गोत्र आजही टिकूून आहेत. यामुळे हनुमान कोण होते, त्यांचा गोत्र तुम्हीच ठरवा असे साय म्हणाले.’ तसेच आदिवासी जातीचा इतिहास सांगून देशाच्या स्वातंत्र्यात आदिवासी समाजाचे मोठे योगदान असल्याचे साय यांनी सांगितले.

पिंपळगाव माळवी येथील जमीन अदिवासींचीच!
ब्रिटिश काळात नगर महानगरपालिकेला पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथे 750 एकर जमीन दिल्याचे सांगितले जाते. 1913 नंतर या जमिनीचे कोणतेच रेकॉर्ड उपलब्ध नाही. या ठिकाणी आदिवासी बांधव हजारो सालापासून वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांची वस्ती तेथे वसवून सर्व मूलभूत सुविधा आदिवासींना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश नंदकुमार साय यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)