हनुमानाबाबत अदिवासींच्या राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षांनीही तोडले तारे 

नवी दिल्ली: महाबली हनुमान हे दलित होते असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी केल्यानंतर आता अनुसुचित जमाती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साई यांनीही या वादात उडी घेताना हनुमान हे अदिवासी होते असे विधान केले आहे.

लखनौ मध्ये गुरूवारी एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की हनुमान हे आदिवासी होते. भगवान राम यांच्या सेनेत वानर, माकडे, अस्वले असे प्राणी होते. कुरुह भाषेत वानर हे स्वतंत्र गोत्र आहे. मी स्वत: कंवार अदिवासी समाजाचा आहे आणि आमचे गोत्र हनुमान असे आहे. त्यामुळे हनुमान हे अदिवासी समाजाचे आहेत असे मी खात्रीपुर्वक सांगू शकतो. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी हनुमानाला कशाच्या आधारे दलित म्हटले आहे याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी केली.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)