हनुमानगिरी महाराजांचे अध्यात्मिक व शैक्षणिक कार्य मोठे- ह.भ.प. गरवारे

पुसेगाव ः हनुमानगिरी हायस्कूल किर्तनसेवा करताना ह. भ.प. गरवारे सर.

पुसेगाव, दि. 13 (वार्ताहर)- श्री सेवागिरी महाराज मठाचे दुसरे मठाधिपती श्री हनुमानगिरी महाराज यांनी अध्यात्मिक क्षेत्राची शैक्षणिक क्षेत्रास जोड देऊन मोठे कार्य केले. पुसेगाव येथे दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून त्यांचे कार्य साऱ्यांनाच वंदनीय आहे, असे विचार ह.भ.प. गरवारे सर यांनी श्री हनुमानगिरी हायस्कूलमध्ये आयोजित प.पू. श्री हनुुमानगिरी महाराज यांच्या 38 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित किर्तन सेवेत व्यक्त केले. यानिमित्ताने विविध स्पर्धामधील विजेत्यांना प्रमाणपत्राने गौरवण्यात आले. कार्यक्रमास सचिव डॉ. सुरेशराव जाधव, एस. आर. पाटील, प्राचार्य डी. पी. शिंदे, पर्यवेक्षक श्रीधर जाधव, जे. बी. जाधव उपस्थित होते. नितीन पंडित व धर्माधिकारी यांनी संगीतसाथ दिली. सुधाकर माने यांनी प्रास्ताविक केले. मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केले. संजय जाधव यांनी आभार मानले.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)