हद्दीलगतच्या 34 गावांबाबात उद्या मुंबईत बैठक

पुणे, दि. 20 ( प्रतिनिधी) – पालिका हद्दीजवळील 34 गावांचा महापालिकेत समावेश करण्यासाठी पालकमंत्री गिरिश बापट यांनी उद्या ( बुधवारी) मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक बोलाविली आहे. या बैठकीसाठी महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह शहरातील सर्व खासदार आणि आमदारांना निमंत्रीत करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सकारात्मक अहवाल राज्यशासनास दिला असून या अहवालावर ही चर्चा केली जाणार असून या बैठकीतील चर्चेवरच या गावांच्या समावेशाचा निर्नय ठरणार आहे. दरम्यान, या गावांच्या समावेशाबाबत स्वत: पालकमंत्री गिरिश बापट यांचीच नकारात्मक भूमिका असल्याने या गावांच्या समावेशाबाबत आणखी उत्सुकता वाढली आहे. या गावांच्या समावेशासाठी हवेली नागरीक कृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या 12 जून रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने तीन आठवडयाच्या आत गावांच्या समावेशाचा निर्णय घेण्याच्या सूचना राज्यशासनास केल्या आहेत. त्यानुसार, शासनाचा निर्नय अंतिम करण्यापूर्वी या लोकप्रतिनिधींची ही तातडीची बैठक बोलाविली आहे. त्यानुसारच, राज्यशासनाकडून न्यायालयात गावांच्या समावेशाबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)