हद्दपारांचा शहरात संचार; पोलिसांकडून कारवाई सुरू

पोलिसांच्या शोध मोहिमेत समोर आला हा प्रकार

नगर: महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांवर हद्दपारीची कारवाई केली होती. कारवाई झालेले काही जण नगर शहरात फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. यातील काही जण पोलिसांसमोरच फिरत होते.

-Ads-

शिवाजी अशोक कदम (वय 20, रा. माळीवाडा), ओंकार रमेश घोलप (वय 20, रा. माणिकचौक),सुनील गोपाल वर्मा (वय 25, रा. सातपुतेगल्ली, केडगाव), विशाल सूर्यकांत यादव (वय 38, रा. पंचवटी कॉलनी), राकेश विठ्ठल वैरागर (वय 26, रा. शांतीपूर) या पाच जणांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. सुनील वर्मा हा तर कोतवाली पोलीस ठाण्यासमोरच फिरत होता. हद्दपारीची कारवाई झालेला नगर शहरात आणि पोलिसांसमोर फिरत असल्याचे लक्षात आल्यावर त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने हद्दपारीचे केलेले अनेक जण नगर शहरात फिरत असल्याच्याकडे दैनिक प्रभातने लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन जिल्हा पोलीस दलाने महापालिका निवडणुकीमुळे हद्दपारांना लगाम लावण्यासाठी सहा पथकांची नियुक्ती केली आहे. हे पथके दिवसासह रात्र शहरात फिरून हद्दपारांवर कारवाई करत आहेत. कोतवाली पोलीस ठाण्यात आतापर्यंत आठ जणांवर कारवाई झाल्याची नोंद आहे. शहर पोलीस उपअधीक्षक या पथकांकडून कारवाईचा दररोज आढावा घेत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)