हत्या झाल्याचे पूर्वीच सांगितले – हरजित सिंह

नवी दिल्ली – इराकमध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयांची इसिसकडून हत्या झाली असल्याचे आपण गेल्या तीन वर्षांपासून सांगत असल्याचे हरिजित मसिह याने म्हटले आहे. हे सर्व भारतीय 2014 मध्ये इराकमधील फॅक्‍टरीमध्ये कामास होते. या भारतीय नागरिकांचे जून 2014 मध्ये अपहरण झाले होते. पुढे काही दिवस आपणासह सर्वांना ओलिस ठेवले गेले. एके दिवशी सर्वांना गुडघ्यावर बसण्यास सांगितले आणि दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हरजित सिंहच्या मांडीमध्ये गोळी घुसल्याने तो बेशुद्ध झाला आणि बचावला. त्यानंतर इसिसच्या दहशतवाद्यांना चकवा देऊन तो जखमी अवस्थेत भारतात परतण्यात यशस्वी झाला.

भारतात परतल्यानंतर बाकीच्या 39 जणांची आपल्या डोळ्यासमोरच हत्या झाल्याचे त्याने सांगितले होते. मात्र त्याच्यावर विश्‍वास न ठेवता 39 भारतीय जिवंत असल्याचे सरकारकडून सांगितले जात राहिले होते. आपले म्हणणे सरकारने कधीच मान्य का केले नाही, हे माहित नाही, असेही तो म्हणाला.

मात्र हरजितने सरकारला खोटी माहिती दिली असल्याचे उघड झाले होते, असे सुषमा स्वराज यांनी आज संसदेत सांगितले. सामुहिक हत्याकांडातून तो बचावला नव्हता. तर काही बांगलादेशी सहकाऱ्यांसह तो निसटला होता. त्यावेळी त्याने आपले नाव अली असल्याचे भासवले होते. एब्रिलमध्ये तो भारतीय अधिकाऱ्यांना सापडला. एब्रिलला कसा पोहोचला हे तो अखेरपर्यंत सांगू शकला नव्हता, असे स्वराज म्हणाल्या. हरजित आणि सरकारच्या दाव्यांमध्ये भेद असल्याचेच यामुळे उघड झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)