हत्याकांडाच्या निषेधार्थ शेवगाव येथे कडकडीत बंद

शेवगाव – शेवगावात एकाच कुटुंबातील चौघांची अत्यंत अमानुषपणे निर्घृण हत्या झाली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. या घटनेच्या निषेधार्थ आज शेवगावकरांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळून रोष व्यक्‍त केला.

हत्याकांडात बळी पडलेले हारवणे कुटुंब बहुतेकांच्या परिचयाचे होते. त्यामुळे बंदच्या वेळी सकाळी संपूर्ण शेवगाव रस्त्यावर होते. यावेळी हातगाड्यांवर किरकोळ व्यवसाय करणाऱ्यांनीही दिवसभर कडकडीत बंद पाळला. काही काळ एसटी बसही बंद होत्या. मात्र, शाळकरी मुलांचे, वृद्ध आणि अडलेल्या प्रवाशांचे हाल नको म्हणून नंतर एसटी बस सुरू करण्यात आल्या.

त्यानंतर आंबेडकर चौकात शोकसभा घेण्यात आली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुभाष लांडे, बापूसाहेब राशीनकर, संजय नांगरे, भाजपचे गंगा खेडकर, आदींची शोकसभेत भाषणे झाली.

ज्ञानेश्‍वर उद्योगसमूहाचे प्रमुख, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात मोठा शामियाना उभारण्यात आला होता; तेथे आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ते सर्व कार्यक्रम या दु:खद घटनेमुळे रद्द करण्यात आले. शेवगाव शहरातील शैक्षणिक संस्थाही बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)