हणबरवाडीसह सर्व पाणी योजना पूर्ण करणार : ना. चंद्रकांत पाटील

मसूर – मसूरसह पंचक्रोशीतील गत 70 वर्षांतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार आहे. याशिवाय परिसरातील सर्व पायाभूत सुविधा पूर्णत्वास नेण्याबरोबरच हणबरवाडी-धनगरवाडीसह सर्व पाणी योजना पूर्ण करणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी दिली.

येथील ग्रामसचिवालय, राष्ट्रीय पेयजल योजना, मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावरील मसूरच्या दुतर्फा पक्की गटर्स व मसूर नं.2 विकास सेवा सोसायटीची इमारत आदी कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या भूमिपूजन व शेतकरी मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, भाजपाचे युवानेते मनोज घोरपडे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ, महेश जाधव, भाग्यश्री मोहिते, सुर्यकांत पडवळ, संजय घोरपडे, दिपाली खोत, जितेंद्र पवार, विजया गुरव, प्रमोद गायकवाड, सुरेश कुंभार उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले, विधानसभेपूर्वी 250 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आणणार असून टप्प्याटप्प्याने हणबरवाडी-धनगरवाडी प्रकल्प पूर्ण होईल. महाराष्ट्रात 151 तालुक्‍यात दुष्काळ जाहीर झाला असून त्याच्या योग्य उपाययोजनांच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ना. शेखर चरेगावकर म्हणाले, धनगरवाडी-हणबरवाडी योजनेचे काम पूर्ण करुन 206 हेक्‍टरला पाणी दिल्याशिवाय मत मागणार नाही. मात्र पाणी मिळाल्यानंतर या विभागातून भाजपाचा आमदार निवडून आणण्याचीही जबाबदारी जनतेची आहे. कोणत्याही चर्चेसाठी खुल्या व्यासपीठावर यावे.

मनोज घोरपडे म्हणाले, आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी सर्वच निवडणुकीत विकासाचे व धनगरवाडी-हणबरवाडी योजनेचे गाजर दाखवून फक्त झुलवत ठेवले. आता विभागातील होऊ घातलेली प्रत्यक्ष कामे साकारल्यानंतर येणाऱ्या निवडणुकीत जनताच आपणाला उत्तर देईल. प्रास्ताविक जयवंतराव जगदाळे यांनी केले. सुत्रसंचालन संभाजी बर्गे यांनी केले. बिपीन जगदाळे यांनी आभार मानले. यावेळी ना. पाटील यांच्या हस्ते श्रीकांत जिरंगे यांना कराड उत्तर भाजपाच्या सरचिटणीसपदी नियुक्तीचे पत्र देवून गौरवण्यात आले. याप्रसंगी जयवंतराव जगदाळे, संजय जाधव, दिनकरराव पाटील, संभाजी माने, नाथाजी पाटील, जयसिंग पवार, शरद जगदाळे, महादेव जगदाळे, प्रल्हाद कांबिरे, युवराज चव्हाण, शेखर जगदाळे, पै. अभिजित निकम, सुनिल चव्हाण, दत्तोपंत शेजवळकर, अशोक सोनार, उत्तमलाल शहा, अभिजीत निकम यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)