हडप केलेल्या देवस्थानांच्या जमिनी ताब्यात घेणार 

मुंबई – देवस्थानांच्या जमिनी बेकायदेशीररीत्या हडप करणाऱ्यांना चाप बसणार आहे. राज्य सरकारच्या महसूल व वनविभागाने महसूली प्राधिकारी व अधिकाऱ्यांना अशा देवस्थानांच्या जमिनीचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. अशा जमिनी आढळल्यास त्यांना योग्य ती कारवाई करून त्या तत्काळ ताब्यात घेणार आहेत.

देवस्थानांच्या जमिनीसंदर्भात राज्य सरकारने आदेश काढले आहेत. बेकायदेशीर हस्तांतरणाची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार राज्य सरकारला 6 महिन्यांमध्ये न्यायालयाला अहवाल द्यावा लागणार आहे. जर देवस्थानांच्या जमिनी बेकायदेशीररीत्या हडप केल्या असतील तर त्या तत्काळ देवस्थानांच्या ताब्यामध्ये देण्यात याव्यात. जोपर्यंत या जमिनी देवस्थानाच्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत त्या शासनाच्या ताब्यात राहणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
4 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)