हडपसर पोलिसांकडून वाहनचोर अटक ; सात वाहने हस्तगत

हडपसर पोलिसांकडून वाहनचोर अटक ; सात वाहने हस्तगत
पुणे,दि.29(प्रतिनिधी)- हडपसर पोलिसांनी पुणे शहर व परिसरात वाहनचोरी करणाऱ्यास अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीची सात वाहने हस्तगत करण्यात आली. या दोन वाहनांची किंमत 2 लाख 35 हजार इतकी आहे.
पुणे शहरात वाहनचोरी आणी घरफोडीच्या गुन्हयांना प्रतिबंध बसावा यासाठी अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे व पोलीस उपायुक्त दिपक साकोरे यांनी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार सहायक पोलीस आयुक्त समिर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्यामार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येत होती. दरम्यान फिर्यादी विकी रमेश आलकुटे (24,रा.हडपसर) याने त्याची होंन्डा युनिर्कार्न आकाशवाणीसमोर पार्क करुन ठेवली होती. ती अज्ञात व्यक्तीने चोरल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर वेगाने तपास करण्यात आला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले तसेच नानासाहेब भारत माने(28,रा.सोलपूर) याला अटक करण्यात आली आहे.त्यांच्या ताब्यातून गुन्हयात चोरीला गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली. तसेच अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आणखी सहा मोटारसायकली चोरल्याचे कबुल केले. याप्रकरणे एकूण सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या, तपासादरम्यान त्यांनी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन, चंदननगर एक, वानवडी एक, यवत एक, पुणे ग्रमीाण हद्दीत एक वाहनचोरीचा गुन्हा केला आहे.
तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक संदिप नारायण देशमाने, हेमंत चंद्रकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस हवालदार युसुफ पठाण, संपत औचरे, राजेश नवले, पोलीस कर्मचारी सैदौबा भोजराज, राजु वेंगरे, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, गणेश दळवी व अकबर शेख यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)