हडपसर एमआयडीसी परिसरात बनावट दारू जप्त

पुणे- बनावट दारू तयार करुन त्यावर नामांकित कंपनीचे लेबल लावून विकणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई हडपसर एमआयडीसी परिसरात करण्यात आली.
येथील डेल्टा डिस्टीलरिज प्रा.लि. या कंपनीत बनावट दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला असता, नामांकित कंपन्यांच्या बाटल्यांत बनावट दारू भरलेल्या सुमारे 59 हजार 760 बाटल्या सापडल्या. तसेच दारू इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत ललित विश्‍वनाथ खाडिलकर, रविंद्र रामकृष्ण तायडे,सुनिल रघुनाथ इंगळे यांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने 27 मार्च पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.,

त्याचबरोबर जप्त करण्यात आलेल्या साठ्यात वेगवेगळे फ्लेवर बनविण्याचा परवाना सरद कंपनीला मिळालेबाबत कंपनीकडे कुठलीही कागदपत्रे नसल्याचे ही आढळून आले,
सहाय्यक फौजदार लक्ष्मण शिंदे,सहाय्यक फौजदार सुंदरम,पोलिस हवालदार माणिक पवार,संतोष मोहिते,प्रविण शिंदे,प्रदीप सुर्वे,महेश वाघमारे,अमजद पठाण,प्रविण काळभोर,गणेश बाजारे स्नेहल जाधव यांनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)