हडपसरमध्ये मध्यरात्री एकावर गोळीबार

बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा जखमी : परिसरात दहशत माजवली

पुणे – साथीदारांना केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी सराईत गुन्हेगाराच्या टोळीने बांधकाम व्यावसायिका मुलाच्या कारचा पाठलाग करून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये तो जखमी झाला आहे. हांडेवाडी रोड ते हडपसर पोलीस ठाण्यादरम्यान मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निलेश शेखर बिनावत (वय-25, रा. हडपसर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी सद्दाम सलीम पठाण (वय-24, रा. सय्यदनगर) याला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी निलेश बिनावत यांचे भाऊबंद व नातेवाईक यांना सय्यदनगर येथे आरोपींनी मारहाण केल्याचे समजले, त्यावेळी फिर्यादी यांच्या वस्तीतील 15 ते 20 मुले येथे गेली.

तेथे त्यांनी आरोपींना जाब विचारला होता. यामुळे चिडलेला आरोपी व त्याचे साथीदार फिर्यादी यांच्या वस्तीत येऊन मारहाण करणार असल्याचे फिर्यादीला निलेशला समजले. यामुळे त्याने शेजारी राहणाऱ्या बहिणीला घरी आणले व बंगल्याचे गेट बंद केले. तेव्हा आरोपींनी दुचाकीवरून येऊन घरावर दगडफेक केली. तसेच गेटवर तलवारी व कोयत्याने वार केले. यानंतर फिर्यादीलाही मारहाण केली. फिर्यादीने वॉचमेनच्या मदतीने आरोपींना बाहेर काढले. यावेळी एका आरोपीने पिस्तुल काढून फिर्यादी निलेशला मारण्याची धमकी दिली.

यामुळे फिर्यादी घटनास्थळावरुन निघून गेला. यानंतर गाडीची तोडफोड होऊ नये म्हणून फिर्यादीने त्यांनी लॅन्ड क्रुझर गाडी गेटमधून काढुन शेजारी ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यात आरोपी पुन्हा दुचाकीवरून तेथे दाखल झाले. त्यांनी फिर्यादीच्या कारचा दुचाकीवरून पाठलाग केला. यानंतर गाडीवर त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यांनी तीन गोळ्या झाडल्या. यानंतर कोयत्यासारख्या शस्त्राने वार करून परिसरात दहशत माजवली. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. शिंदे करत आहेत.

सुमारे आठ जणांवर आर्म ऍक्‍ट

वानवडी पोलिसांनी सहा ते आठ जणांवर आर्म ऍक्‍ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा संबंध गोळीबाराच्या प्रकरणाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबाराच्या घटनेअगोदर काही व्यक्‍ती शस्त्र घेऊन हांडेवाडी येथील इमादार मैदान येथे जमले होते. ते आरडा-ओरडा करत धारदार शस्त्रे घेऊन परिसरात दहशत पसरवत होते. त्यांच्याकडे तलवार व कोयते होते. फिर्यादी पोलीस शिपाई तानाजी मुद्देवाडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींचा पाठलाग केला असता, आरोपी हत्यारे व मोटारसायकली जागेवरच टाकून पळून गेले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. गायकवाड करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)