हडपसरमध्ये भर रस्त्यात सराईताचा खून

पुणे – हडपसर परिसरातील गोंधळेनगरमध्ये भर रस्त्यात एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला. बुलेटवरुन जात असलेल्या या गुन्हेगाराचा दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केला आहे. ही घटना दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. याप्रकरण हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात माहिती देताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार यांनी सांगितले, सुजीत वर्मा असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात हाणामारी व इतर असे पाच गुन्हे दाखल होते. दुपारी तो बुलेटवरुन गोंधळेनगर परिसरातून चालला होता. दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी त्याला रस्त्यात आडवून धारदार शस्त्राने वार केले. ही घटना एका नागरिकाना पोलीस ठाण्याला कॉल करुन सांगितली.

-Ads-

घटनास्थळी तातडीने पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. त्यांनी त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथे तपासणी केल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या खूनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांचे पथक गुन्हेगारांच्या शोधासाठी रवान झाले आहे. दरम्यान, भररस्त्यात ही घटना घडल्याने गोंधळेनगर परिसरात खळबळ उडाली होती. पूर्व वैमनस्यातून हा खून झाला असल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
3 :cry: Sad
5 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)