हडपसरमध्ये एटीएम पूर्वपदावर

विवेकानंद काटमोरे

हडपसर – पंधरा दिवसांपासून अपुऱ्या रोकड व बॅंकिंग क्षेत्रातील व्हायरसमुळे शटर झालेली एटीएम हडपसर उपनगरात पूर्वपदावर आली आहेत. गेल्या काही दिवसांत वानवडी, हडपसर, मुंढवा व मांजरी परिसरातील अनेक एटीएम बंद स्थितीत होती. त्यामुळे ग्राहकांना पैसे मिळवण्यासाठी पायपीट करावी लागत होती. मात्र बुधवार पासून एटीएम सुरळीत झाल्याचा दावा परिसरातील बॅंकाकडून करण्यात येत आहे.
नोटाबंदी निर्णयानंतर सहकारी आणि खासगी, व्यापारी बॅंकांना करन्सी चेस्टचा तुटवडा जाणवत होता. त्यातच व्हायरसमुळे अनेक एटीएम सिस्टीम बंद राहिल्याचे सहकारी बॅंकेच्या सुत्रांनी सांगितले. अपुऱ्या चलन पुरवठ्यांमुळे हडपसर परिसरातील अनेक एटीएमचे शर्टर डाऊन झाले होते. अनेक एटीएम सेंटरच्या समोर क्षमस्व, एटीएम बंद आहे, असे बोर्ड झळकत होते.
सुट्यांमुळे गावी जाण्याच्या तयारीत असलेल्यांना त्याचा चांगलाच मन:स्ताप सहन करावा लागला होता. पुरेशी रोकड उपलब्ध होत नसल्याचे कारण सांगण्यात येत होते. पण बुधवार व गुरूवारपासून यामध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले. बंद असलेली अनेक एटीएममधून पैसे काढताना ग्राहक दिसत होते. त्यामुळे हडपसर, मांजरी, मुंढवा या भागातील एटीएमची स्थिती पूर्वपदावर आल्याचे दिसत आहे.
नोटाबंदी निर्णयानंतर सहकारी बॅंकांना करन्सी चेस्ट बॅंकांकडून अपुरा चलनपुरवठा होता. त्यामध्ये काहीशी वाढ झालेली असली, तरी मागणी आणि पुरवठ्यांमध्ये ताळमेळ बसत नसल्याने बॅंक व्यवस्थापनाकडे प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)